चाहूल

 चाहूल


उगवलेला दिवस आज

वेगळाच भासु लागला

पदरावरचा मोर माझ्या

अचानक नाचू लागला


मनाला लागली चाहूल

येईल आज कोणीतरी

साद घालू लागले पक्षी

समोर बसून फांदीवरी


पक्षांनी ही दिले संकेत

सजना माझा येण्याचे

कोकिळा गाऊ लागली

बोल मंजुळ गाण्याचे


खूप दिवसानंतर आज 

पुन्हा भेट होणार आहे

त्याच्यासंग आज पुन्हा

प्रेमगीत मी गाणार आहे


    सिताराम कांबळे

Comments