____जखमी मन____
कसा आहेस विचारल्यावर
मजेत आहे बोलावं लागतं
आपल्याच मसणसांपासून
दुःख लपवून हसावं लागतं
हसावं लागतं बोलावं लागत
दुनिये सोबत चालावं लागतं
कितीही झाल्या जखमा तरी
फुंकर घालून जगावं लागत
मनावर ही होतात जखमा
फक्त दिसत नाही कुणाला
किती होतात वेदना आतून
माहीत असतं फक्त मनाला
वरून चेहरा दिसतो हसरा
मन ते आतून रडत असतं
गिळून अश्रू डोळ्यामधले
फक्त आनंद दाखवत असतं
सिताराम कांबळे
Comments
Post a Comment