सुशिक्षित बेकार

सुशिक्षित बेकार


आई वडिलांना वाटतं

मुलांनी खूप शिकावं

मुलांसोबत समाजात

आपलंही नाव व्हावं


घेतलंय शिक्षण मी पण

झालोय मी सुशिक्षित

तरीही जीवन माझं

वाटत नाही सुरक्षित


ईच्छा असूनही माझी

काम हाताला मिळेना

गरीबीची परिस्थिती

काही केल्या जळेना


कामधंद्याच्या शोधात

गावोगावी भटकतोय

तरीही मिळेना काम

बेकारच मी फिरतोय


सुशिक्षित बेकार मी

गरीबीशी लढतोय

पोटाला लागलेली आग

पाण्यानेच वीझवतोय


   सिताराम कांबळे 

Comments