सख्या तुझ्या विरहात
रात्रंदिवस जळत होते
जीव डोळ्यात आणून
वाट तुझी बघत होते
वाटलं होतं मला तू
आज तरी भेटशील
प्रेमाने जवळ येऊन
कवेत मला घेशील
पण तू आलाच नाही
का मला तू फसवलं
अचानक मला सोडून
मन माझं तू दुखवलं
अश्रूंचा बांध फुटला
गेले रे मी दूर वाहून
नको दुखवू मला आता
पुन्हा तू जवळ येऊन
सिताराम कांबळे
Comments
Post a Comment