सजनाच्या भेटीसाठी

सजनाच्या भेटीसाठी


सजनाच्या भेटीसाठी

जीव झाला ग आतुर

आज भेटेल सजना

जीव नाही थाऱ्यावर


झाला आनंद मनाला

मन फुलपाखरू झालं

आनंदाने आभाळात

घिरट्या घालाया लागलं


आज दिवस वेगळा

माझ्यासाठी आनंदाचा

आनुभवेल मी आज

स्पर्श माझ्या सजनाचा


माझ्या मनाच्या मळ्यात

गुलाब गुलाबी फुलला

खूप दिवसांनी आज

सजना भेटेल गं मला


  सिताराम कांबळे 

Comments