आदिवासी रत्न ठकाबाबा गांगड

_____💐🙏🏼💐____

आमची आदिवासींची शान
होता ठकाबाबा महान
त्या उडदावने गावात
एक रत्न मिळाले छान

त्याने निसर्ग मित्राची
भूमिका वठवली छान
त्यांच्या महान कलेचा
आहे सर्वांना अभिमान

त्याचा आवज ऐकून
प्राणी पक्षी होती गोळा
त्याच्यासंग रानामध्ये
भरे प्राणी पक्षांचा मेळा

आता हरवला आवाज
प्राणी पक्षी मुके झाले
आपल्या सर्वांना सोडून
निसर्गात विलीन झाले

आदिवासी रत्न ठकाबाबा गांगड
  🙏🏼यांना विनम्र अभिवादन🙏🏼
                💐💐💐

Comments