माहेरची वाट

 __ माहेरची वाट__


माझ्या माहेरची वाट

मला आवडते फार

तिने जोडून ठेवले

माझं सासर माहेर


माझ्या माहेरची वाट

पाना फुलांनी नटली

खूप दिवसांनी आज

तीही आनंदी वाटली


माझ्या माहेरची वाट

जरी दिसते वाकडी

तिच्या वरून वहाते

प्रेम भरून गं होडी


माझं माहेर सासर

आहे प्रेमाचा सागर

याच सागरात होतो

रोज प्रेमाचा जागर


 सिताराम कांबळे

Comments