गावच्या समस्या

 _____गावच्या समस्या____


आजून गावात एस टी दिसना

कोणी सायकलवरती बसना

मणके झालेत ढिल्ले आमचे

खड्डयात रस्ता दिसना


जर का पडलं कोणी आजारी

लोकं जमतात शेजारी पाजारी

म्हणतात आता शोधावा कुठं

दवाखाना याला सरकारी


पोरं झालेत आमची बेकार

यांना गावात निळेना रोजगार

दुसऱ्याच्या गावात जाऊन पोरं

झालेत त्यांचेच चाकर


ऑनलाईनचा आलाय जमाना

आमच्या गावात रेंजच मिळना

कसा करावा अभ्यास आपल्या

पोरांना काहीच कळना


आता उन्हाळा आला थाटून

गेले विहिरी तलाव आटून

पाण्यासाठी वनवन फिरतोय

डोक्यावर हांडा घेऊन


    सिताराम कांबळे

Comments