___आकाश भ्रमण___
खूप वाटतं नेहमी मला
आकाश भ्रमण करावं
वेगवेगळे ढगांचे रंग
जवळ जाऊन बघावं
ढगांच्या विमानात बसून
पृथ्वी प्रदक्षिणा करावी
सप्तरंगी इंद्रधनुषाची
कमान हाती धरावी
पृथ्वीचं सौंदर्य रोज
आकाशातून बघावं
स्वच्छंदी पाखरासारखं
आकाशातून फिरावं
ढगांचाच बांध घालून
धरण वरती बांधावं
पाहिजे तितकेच पाणी
धारणीवरती सोडावं
वीज आणि ढगाचं नातं
त्यांच्याकडूनच जाणावं
त्यांच्यासारखं अतूट प्रेम
आपण सुध्दा करावं
सिताराम कांबळे
८६५२७५९९२८
Comments
Post a Comment