समुद्र किनारा
आज खूप दिवसांनी
आलो समुद्र किनारी
आज होऊ दोघे स्वार
प्रेमाच्या लाटेवरी
हा सागर किनारा
छान थंडगार वारा
आज मिळू दे सखे गं
तुझ्या कुशीत निवारा
प्रेम सागराच्या लाटा
झोंबु लागल्या अंगाला
गेले शहारून आंग
ओढ लागली मनाला
भेट आपली झाली
या सागरा किनारी
दोन प्रेमाचे गं पक्षी
घेऊ लागले भरारी
सिताराम कांबळे
Comments
Post a Comment