__पहिला पाऊस__
विजांचा कडकडाट
ढगांचा गडगडाट
आला वाजत गाजत
वरून राजा अंगणात
ढग विजांचं संगीत
आकाशात चालू झाले
त्याच्या तालावर आज
पशु पक्षीही नाचले
जलधारा बरसल्या
आला मातीला सुगंध
तृप्त झाली ती धरती
झाला सर्वांना आनंद
वसुंधरा झाली थंड
आला हावेत गारवा
रोज मिळावी आम्हाला
अशी थंडगार हावा
सिताराम कांबळे
Comments
Post a Comment