प्रेम केलं तुझ्यावर

प्रेम केलं तुझ्यावर


प्रेम केलं तुझ्यावर शेवटाला नेईल

तुझ्यासाठी प्रेमाचं गीत रोज गाईल

मेलो तरी नाव तुझं ओठावर राहील |धृ |

 

तुझ्या माझ्या प्रेमाची वेगळी कहाणी

मीच तुझा राजा आणि तूच माझी राणी

तुझ्या प्रेमात गेलो अखंड बुडूनी

तुझ्या नावाचा जप करतो मनोमनी

गेलो जरी लांब तिथून तुला पाहिल

मेलो तरी नाव तुझं ओठावर राहील |१|


नकळत तू ग माझ्या घुसली मनात

हाक मी दिली तू ग दिली मला साथ

हात माझा प्रेमाने घेतला हातात

दिलं वचन देईल आयुष्याची साथ

तुझ्या सुख दुःखात सहभागी होईल

मेलो तरी नाव तुझं ओठावर राहील |२|


तुझ्याभोवती फिरतंय माझं वेड मन

तुझ्या हृदयात त्याला ठेव तू जपून

दूर लोटू नको त्याला परका म्हणून

जीव माझा तुझ्यामध्ये गेलाय गुंतून

जीवन हे सारं माझं तुझ्यासाठी वाहील

मेलो तरी नाव तुझं ओठावर राहील |३|


             सिताराम कांबळे 

Comments