____भरून आलं आभाळ_____
गारगार वारा,पाऊस धारा, आंग हे भिजतय गं
आज भरून आलं आभाळ,पाणी टीपटीप पडतंय ग
भिजून गेले झाडं वेली, भिजले हे डोंगर
भिजून गेलं शिवार सारं, झालंय हिरवं गार
रान पाखरू उडतंय ग,कस फडफड करतंय गं
आज भरून आलं आभाळ,पाणी टीपटीप पडतंय गं
चाल ग सजनी जाऊ फिरायला डोंगर माथ्यावर
हिरव्या रानात,गारगार वाऱ्यात,खेळू या गवतावर
रानफुल हे फुलतय ग,कसं तोऱ्यात डोलतय गं
आज भरून आलं आभाळ पाणी टीपटीप पडतंय गं
लाल लाल माती चिकट झाली करू नको गं घाय
आवघड आहे वाट थोडीशी घसरल गं तुझा पाय
पाणी पाटानी पळतय ग,कसं खळखळ वाजतय गं
आज भरून आलं आभाळ पाणी टीपटीप पडतय ग
खेटू लागला वारा अंगाला, वाटतय गं गार गार
दिसू लागलं रान गुलाबी,फुललं सारं शिवार
छान सुगंध सुटलाय गं, हवाहवासा वातलाय गं
आज भरून आलं आभाळ पानी टिपटीप पडतंय गं
सिताराम कंबळे
Comments
Post a Comment