जव्हारचे महाराजे - यशवंतराव मुकने

___जव्हारचे महाराजे___

     यशवंतराव मुकने


आधी नमन भिमाशंकराला

शूर मावळ्यांना,क्रांतीवीरांना 

मग वंदीतो काळसुआई

भीमा शंकराची कळमजाई

सुकाळवेढ्याची वरसुबाई जी जी जी


करू वंदन महाराजाला

मुकने यशवंत रावाला

त्याच्या महान कार्याला

शाहीर हा गातो कवणाला

यशवंत रावांच्या पोवाड्याला जी जी जी


डिसेंबरच्या ११ तारखेला

१९१७ सालाला

जव्हारच्या मुकने घराण्याला

राजपुत्र जन्माला आला

सारा कोळवन आनंदून गेला जी जी जी


महादेव कोळी समाजाला

आदर्श राजा मिळाला

न्याय दिला सर्व समाजाला

मर्द मावळे घेऊन सांगतीला

जव्हार राज्याचा कारभार हाकला जी जी जी


विकासाचा ध्यास घेऊन

जनतेचा विचार करून

चालू केली विद्यालय

दवाखाने,वाचनालय

उद्योग धंद्यांना दिला वाव जी जी जी


जून महिना चार तारखेला

१९७८ सालाला

काळाने घाला घातला

दुःखात लोटले जनतेला

आमच्या राजाला घेऊन गेला जी जी जी


राजे नसले जरी आपल्यात

आपल्या कोळवन राज्यात

कीर्ती नाही त्यांची संपणार

महाराजे अमर राहणार

रोज त्यांचा होतोय जय जयकार जी जी जी


         सिताराम कंबळे 

Comments