______आई रानुबाई_____
रानुबाई,आमची आई,रूप तिचं सुंदर
आहे सर्वांगीण सुंदर आमच्या आईच मंदिर
चला गारवाडीला जाऊ
रानुबाईच दर्शन घेऊ
चोळीचा खण,आईचा मान,देऊ तिला सत्वर
आहे सर्वांगीण सुंदर आमच्या आईच मंदिर
पिंपळदऱ्यात आईच ठाण
देऊ तिलाच पाहिला मान
तुझीच कृपा,राहू दे आता,भोळ्या भक्तांवर
आहे सर्वांगीण सुंदर आमच्या आईच मंदिर
बसली होती तू वावरात
आज बसली तू देवळात
कळस छान,शोभून दिसतोय,तुझ्या मंदिरावर
आहे सर्वांगीण सुंदर आमच्या आईचे मंदिर
चला दर्शनाला जाऊ
भक्तिभावाने दर्शन घेऊ
जीर्णोद्धार,झालाय आज,करतो तुझा जागर
आहे सर्वांगीण सुंदर,आमच्या आईच मंदिर
सिताराम कांबळे
सुंदर
ReplyDelete