आमचं सरकार

___आमचं सरकार___
   आम्ही जबाबदार

कोण कुणाचा करतंय घात
येतंय का कुणाच्या लक्षात
सत्तेचा मलिदा खाण्यासाठी
जनतेचा होतोय विश्वासघात

पुढारी मारतात माकड उड्या
इकडून तिकडे थोड्याथोड्या
कार्यकर्त्यांनो उचला सतरंज्या
आपसात करा डोके फोड्या

सत्तेचा मलिदा नेते खाणार
कार्यकर्त्यांना मार बसणार
डोळे उघडून बघा एकदा
कसं चाललंय आपलं सरकार

आपण फक्त आंधळे मतदार
डोळे झाकून मतदान करणार
चांगला समजून निवडून देणार
आपलाच विश्वासघात करणार

आसं आपलं गतिमान सरकार
कुणासाठी काही नाही करणार
एकमेकांची जिरवत बसणार
जनता मात्र अशीच मरणार

म्हणतात नेते घेतात खोके
कार्यकर्त्यांचे फुटतात डोके
कधीही कुणाला देतो धोके
म्हणून आमचं सरकार ओके

       सिताराम कांबळे

Comments