राजकारण

____राजकारण___

किती छान आहे ना
राजकारणातलं काम
सरकारी आधिकारी 
होतात यांचेच गुलाम

आधीकारीही हातात
आधिकार पण हातात
मग कोण आडवणार 
कितीही करा भ्रष्टाचार

राजकीय पुढारी जनु
चोरांची टोळी झालेय
विकास कामांची मात्र
आज येथे होळी झालेय

लागूद्या मागे ईडीचा साप
माहाशक्ती आपलाच बाप
चला त्याच्या आश्रयाला
सर्व काही होतंय माफ

आरोप आणि प्रत्यारोप
यातच सारे व्यस्त आहेत
समस्यांच्या आजाराने
जनता चिंताग्रस्त आहे

कुणाचं शक्ती प्रदर्शन 
कुणाचं खोट उपोषण
यात रोजच होत फक्त
सामान्य जनतेच मरण

काही जण दौरे करतात
काही  फुकट फिरतात
काही तर रात्रंदिवस
बाईटच देत बसतात

झोपलेल्या मतदारांनो
आता तरी जागे व्हा
निवडून दिलेले प्रतिनिधी
काय करतात ते तरी पहा

    सिताराम कांबळे

Comments