आईचं लुगडं

___आईचं लुगडं__

माझ्या आईचं लुगडं
होती मायेची ती ऊब
छान बांधून ठेवलं
होतं एकत्र कुटुंब

माझ्या आईच लुगडं
त्याची शिवली गोधडी
एकदा बघा पांघरून
साखर झोपेची ती गोडी

माझ्या आईच लुगडं
होता मायेचा पदर
मायेच्या सावलीत
होतं सारं घरदार

माझ्या आईच लुगडं
जणू शाल ऊबदार
ऊन पावसात होता
आम्हा तिचाच आधार

माझ्या आईचं लुगडं
होती उन्हात साऊली
आम्ही बसलो उन्हात
गेली निघून माऊली

  सिताराम कांबळे

Comments