आला गं आला गं विश्व आदिवासी दिन आला गं
झाला गं झाला गं माझ्या मनाला आनंद झाला गं
विश्व आदिवासी दिन सोन्याचा
आहे आदिवासींच्या मानाचा
लुटू आनंद आपल्या सणाचा
या नऊ ऑगस्टच्या दिनाचा
खेळा गं खेळा गं आता झिम्मा फुगड्या खेळा गं
आला गं आला गं विश्व आदिवासी दिन आला गं
चला मिरवणुकीला जाऊ या
डोळे भरून सोहळा पाहू या
हाती फडकी झेंडा घेऊ या
आदिवासींची गाणी गाऊ या
झाला गं झाला गं ढोल ताशांचा आवाज झाला गं
आला गं आला गं विश्व आदिवासी दिन आला गं
चला मिळून सर्व जाऊ या
आज रॅलीत सामील होऊ या
एकमेकांना सोबत घेऊ या
आदिवासींची एकी दाऊ या
झाला गं झाला गं आपला समाज एकत्र आला ग
आला गं आला गं विश्व आदिवासी दिन आला गं
Comments
Post a Comment