हाती घेऊन फडकी झेंडा,पोरं रॅलीत नाचाया लागली

ही आदिवासींची पोरं,नऊ ऑगस्टच्या रॅलीला चालली
हाती घेऊन फडकी झेंडा,पोरं रॅलीत नाचाया लागली

रॅली निघाली आमची थाटात
आली राव्होजी भांगरे चौकात
ढोल तारपाच्या तालावर,धुंद होऊन नाचाया लागली
हाती घेऊन फडकी झेंडा,पोरं रॅलीत नाचाया लागली

विश्व आदिवासी दिन थाटात
साजरा करतो आमच्या गावात
आमची आदिवासी संस्कृती,आता जगाला कळाया लागली
हाती घेऊन फडकी झेंडा,पोरं रॅलीत नाचाया लागली

विश्व आदिवासी दिन सोन्याचा
आहे आदिवासींच्या मानाचा
सण म्हणून लहान थोर,आता साजरा करायला लागली
हाती घेऊन फडकी झेंडा,पोर रॅलीत नाचाया लागली

ज्ञानेश्वर जाधव गावात
आले उमेश गोडे रॅलीत
तुषार भाऊ सतीश गोडे,यांनी रॅलीला हजेरी लावली
हाती घेऊन फडकी झेंडा,पोरं रॅलीत नाचाया लागली

Comments