*९ऑगस्ट जागतिक*
*आदिवासी दिनानिमित्त*
*हार्दिक शुभेच्छा!*
******************************
*९* ऑगस्ट जागतिक
आदिवासी दिन,समाज
बांधव मोठ्या संख्येनं।
स्नेह जिव्हाळ्यानं,
एकत्र साजरा करतात
*उत्सवाला*॥१॥
*जोपासा बांधवांनो*
*आदिवासी संस्कृतीला!*
*एकजुटीचा नारा मुखाने*
*"जय आदिवासी", बोला!!*
*ऑ* गस्ट ०९ तारखेला,
सन१९४४ला। संयुक्त
राष्ट्रसंघाने घोषित
केला,जागतिक
आदिवासी दिन साजरा
*करण्याला* ॥२॥
*ग* र्दी विविधतेने नटलेल्या
समाज बांधवांची,नृत्य,
कला,वेशभूषा प्रदर्शनाची।
बांधिलकी संस्कृतीची,
परंपरा,चाली,रीती, रूढी
*टिकविण्याला*॥३॥
ध *स्ट* पुष्ट निधड्या
छातीचे,चपळ,
निरोगी,काटक
शरीराचे।
रक्षक वनराईचे,
आदिवासी पूजिती
*निसर्गाला*॥४॥
*जा* गतिक पातळीवर केले
सर्वेक्षण, मूळनिवासी
समूहाचे कार्य महान।
आदिवासींचा सन्मान,
व्हावा मुख्य आधुनिक
*प्रवाहाला*॥५॥
*ग* रज लक्षात घेऊन
गांभीर्याने,अमंलबजावणी
करणे।ठरविले संयुक्त
राष्ट्र संघाने मूलभूत
*सुविधा देण्याला*॥६॥
*ति* ष्ठत उभे आदिवासी
मुख्य प्रवाहापासून दूर,
मिळेना शिक्षण,आरोग्य,
रोजगार। राहिले वंचित
आजवर, घेण्या सेवा
*सुविधांला*॥७॥
*क* रण्या सक्षम आदिवासी
बांधवांना, संरक्षण न्याय
हक्कांना। मूलभूत सेवा
सुविधांना,तळागाळापर्यंत
*पोहचविण्याला*॥८॥
*आ* दिवासी जमातीच्या
विकासाची भूमिका
घेतली,भारतीय
संविधानानुसार
१९५० साली। मोठी
तरतूद करण्यात
आली, समाजाचे हित
*रक्षणाला*॥९॥
*दि* वस पूर्वीचे स्वतंत्र
व्यवस्था समाजाची,
रूढी, प्रथा,परंपरा,
सामाजिक कायद्यांची।
स्वयंपूर्णतेची,जीवनशैली
*जगण्याला*॥१०॥
*वा* ईट प्रवृत्ती ब्रिटिश
साम्राज्याची,मालकी
जंगल जमिनीची, हक्क
हिरावून घेण्याची,
योजना घातक समाज
*व्यवस्थेला*॥११॥
*सी* मा उल्लंघन आदिवासी
व्यवस्थेचे,वारे प्रतिकूल
परिणामाचे। विविध
समस्यांना तोंड देण्याचे,
विघ्न आदिवासी
*समाजाला*॥१२॥
*दि* ले आता संरक्षण पेसा
कायद्याने,मुख्य उद्देश
आदिवासी संस्कृती जतन
करणे। रूढी प्रथा परंपरा
टिकविणे,माध्यम
ग्रामसभेचे स्वयंशासन
*बळकटीला*॥१३॥
*न* मन पहिले क्रांतिवीरांना,
बिरसा राघोजींना।
मानवंदना, साहित्य रत्न
डॉ गोविंद गारे साहेबांच्या
*स्मृतीला*॥१४॥
*शाहीर भिमाजीचा*
*साष्टांग दंडवत समाज*
🙏🏻 *बंधू भगिनींला!*🙏🏻
******************************
Comments
Post a Comment