आमची शौर्यगाथा

-----आमची शौर्यगाथा---

तुम्ही स्वीकारले वीरमरण
आम्ही रचतो आमचे सरण
तुमच्या स्मारकावर बसून
आम्ही करतो राजकारण

शूर वीरांनो तुमच्या विचारांच्या
कितीतरी चिता पेटवू आम्ही
त्याच चितांवर समाजाचे
तुकडे करून भाजू आम्ही

मान,पान आणि प्रतिष्ठेपुढे
क्षुल्लक आहे तुमचं बलिदान
आमची संघटना आमचं नाव
या साठी करतो जिवाच रान

तुमच्या बलिदानाची गाथा
आम्ही नाही कधी विसरणार
पण स्वार्थी राजकारणासाठी
समाजाचे तुकडे करतच राहणार

        सिताराम कांबळे

Comments