________एस टी______
आरक्षनाने लावली सगळीकडे आग रं
आरक्षण खाऊ नाही सर्वांना सांग रं
उठा आता पेटून सरु नका मागं रं
जो तो एस टी मागे पळू लागला सुसाट
वाटतंय त्यांना सर्व मिळेल फुकाट
करू या विरोध यांना बानोनीया वाघ रं
उठा आता पेटून सरु नका मागं रं
वेळ नाही राहिली आता स्वस्थ ही बसायची
सर्वांना घाई झाली एस टी त घुसायची
चला आता बंद करू एस टी चं ते दार रं
उठा आता पेटून सरु नका माग रं
एस टी मध्ये बसायची झाली त्यांना घाई
आधीच फुल झाली आहे जागा त्यांना नाहीं
काही केलं तरी जागा नाही भेटणार रं
उठा आता पेटून सरु नका मागं रं
एस टी आमची हक्काची आम्हीच मालक
संविधान आहे आमच्या एस टी चा चालक
फिरू नका सारखं आसं तिच्या मागं मागं रं
उठा आता पेटून सरु नका मागं रं
सिताराम कांबळे
Comments
Post a Comment