____नाती गोती____
आरे माणसा माणसा
किती रे तू स्वार्थी झाला
नाती गोती आई बाप
सारे विसरून गेला
मालमत्ता पूर्वजांची
तिच्यासाठी तू भांडतो
भाऊ आसुन भावाचा
मुडदा तूच रे पाडतो
शिकून तू मोठा झाला
सुखावला मनोमनी
वयोवृद्ध आई बाप
त्यांना सांभाळीना कोणी
नाती गोती तू रक्ताची
पैशासाठी नको तोडू
आई बाप बहीण भाऊ
वाऱ्यावर नको सोडू
पैसा पैसा करशील
माझं माझं म्हणशील
जागेवर बसशील
तेव्हा काय करशील
हीच नाती होती तेव्हा
कामी तुझ्या रे येतील
जीवनाच्या प्रवासात
साथ तुला रे देतील
सिताराम कांबळे
Comments
Post a Comment