प्रेमात जगावं प्रेमात मरावं
प्रेमात जगावं प्रेमात मरावं
साऱ्या जगावरती आसं प्रेम करावं
नको भेद भाव येथे नको जाती धर्म
चांगले असावे नेहमी आपले हे कर्म
आडी आडच्णीला सहकार्य करावं
साऱ्या जगावरती आस प्रेम करावं
फसवू नका हो आसं कधीच कुणाला
कस वागतो विचारा आपल्या मनाला
दूर्गुंनांना आपल्यापासून दूर करावं
साऱ्या जगावरती अस प्रेम करावं
वाटनीसाठी भांडू नका भावाभावात
एकोप्याने रहा इज्जत मिळेल गावात
शात्रुलाही एकदा तरी माफ करावं
साऱ्या जगावरती आस प्रेम करावं
नका करू आन्याय पैशांच्या जोरावर
नाही काही येणार संगती मेल्यावर
माणसाने माणसा सारखं वागावं
साऱ्या जगावरती आस प्रेम करावं
Comments
Post a Comment