मानवता धर्म

...मानवता धर्म...


नका मानू जात
नका मानू धर्म
चांगले आसावे
आपले हे कर्म

नाही निरंतर
पद आणि पैसा
दाखवील जागा
आपला आरसा

जात पात सोडा
माणसाला जोडा
झाले मत भेद
संयमाने सोडा

सत्ता आणि पैसा
नाही सर्व काही
शेवटी सोबत
काही येत नाही

आजचा दिवस
जगा समाधानी
उद्याचा दिवस
पाहिला ना कोणी

मानवता धर्म
सर्वात महान
जपा सर्व जन
जगा आनंदान

सिताराम कांबळे

Comments