गारवाडी गाव

----- गारवाडी गाव ------

नगर जिल्ह्यात,अकोले तालुक्यात
नाही दिसणार आसं दुसरं गाव
एक नंबर गारवाडी गाव
आमचं गाव एक नंबर गारवाडी गाव

पावसाळ्यात झाडा झुडपांनी नटल
जमिनीवर जणु स्वर्गच वाटलं
चाचऱ्या डोंगर,समोर बौल्याचा डोंगर
मध्ये वसलाय आमचा गाव
एक नंबर गारवाडी गाव
आमचं गाव एक नंबर गारवाडी गाव

सण साजरे करतो आम्ही एकत्र येऊन
जुन्या चालीरीती आम्ही ठेवल्यात जपून
सर्वेश्वर मंदिर,गारमाता मंदिर
रानुबाईच घेऊ या नाव
एक नंबर गारवाडी गाव
आमचं गाव एक नंबर गारवाडी गाव

पांगर माळामागे आहे तोरण घाट
ढगाखालून गेली लामटीची ती वाट
मोठ्या देवाचा ओढा,खाली तासाचा कडा
उंबर डोहाचा लागे ना ठाव
एक नंबर गारवाडी गाव
आमचं गाव एक नंबर गारवाडी गाव

उन्हाळ्यात आंबे जांभळं पिकती
करवंदाच्या जाळी ओझ्याने वाकती
ढवळ्या आंब्याचा पाड,लय लागतो गॉड 
कमी झालाय आता त्याचा भाव
एक नंबर गारवाडी गाव
आमचं गाव एक नंबर गारवाडी गाव

           सिताराम कांबळे

Comments