------- दंगल -------
बिघडवली डोकी तुमची
तुम्ही ही बिघडून घेतली
जातीवादाच्या आगीत
तुम्ही ही उडी घेतली
बिघडवणारे फिरतात
पोलिसांच्या संरक्षणात
तुम्ही मात्र जळून मरा
दंगलीच्या या वणव्यात
आज कबरी पडतील
उद्या मंदिर जळतील
याचाच बदला म्हणून
गरिबांची घर जळतील
ज्यांनी आग लावली
ते दूर पळून जातील
मुख्य आरोपी म्हणून
तुमचा बळी देतील
संसार तुमचेच उद्या
उघड्यावर पडतील
तुमचाच वापर करून
तुम्हालाच गाडतील
राजकारणी लोकांच्या
नका रे लागू नादी
तुमच्याच हाताने तुमची
करू नका बरबादी
सिताराम कांबळे
Comments
Post a Comment